25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeलातूरवडील व मुलाचा पाझर तलावात बुडून मृत्यू , माळहिप्परगा येथील दुर्दैवी घटना

वडील व मुलाचा पाझर तलावात बुडून मृत्यू , माळहिप्परगा येथील दुर्दैवी घटना

एकाच चितेवर अन्त्यसंस्कार

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा गावचे शेतकरी तिरुपती बाबुराव पवार (वय ४२ वर्षे) व त्यांचा मुलगा नामदेव तिरुपती पवार (वय १२ वर्षे) हे दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३:५० च्या दरम्यान पाझर तलाव क्र. २ येथे त्यांच्या बैलाला तलावात धूत असताना अचानक ही दुर्दैवी घटना घडली व बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माळहिप्परगा येथील तरुण शेतकरी तिरुपती बाबुराव पवार व त्यांचा मुलगा नामदेव तिरुपती पवार त्यांच्या बैलांना धुण्यासाठी तलावात घेऊन गेले असताना अचानक बैल खोल पाण्यात गेले. त्यांना बाहेर हाकलण्याच्या प्रयत्नात मुलगा नामदेव पवार पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न त्याच्या वडिलांनी केले पण त्यात त्यांचा पण पाण्यात बुडून मृत्यू झाला.

हे वृत्त शेजारील शेतक-यांच्या लक्षात येताच त्यांना पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयन्त केला पण दोघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले त्यामुळे माळहिप्परगा गावचे पोलिस पाटील धोंडिराम राठोड यांनी पोलिस स्टेशन जळकोट व माळहिप्परगा सज्जाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना मोबाईलवरून संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली, तात्काळ जळकोट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मुंडे कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले तसेच तलाठी आकाश पवार व मंडळ अधिकारी कांबळे साहेब घटनास्थळी उपस्थित झाले. पंचनामा करून जळकोट येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

शवविच्छेदन करून माळहिप्परगा येथे मयत बाप-लेकावर अत्यंत शोकाकुल वातावरणात एकाच चितेवर अन्त्यसंस्कार करण्यात आले.

मयत तिरुपती पवार हे त्यांच्या वडिलांना एकटेच होते तसेच मयत तिरुपती पवार यांना चार मुली व एकच मुलगा होता. या दुर्दैवी घटनेत बाप व मुलाचा मृत्यू झाल्याने या घरावर फार मोठे संकट कोसळले आहे आता घरचा कर्ता पुरुष व एकुलता एक मुलगा गेल्याने चार मुलींचा सांभाळ करण्यासाठी मयत तिरुपती पवार यांच्या पत्नीवर हलाखीच्या परिस्थितीमध्ये फार मोठे संकट उभे राहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR