32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी कर्मचा-यांचा संप

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृति समितीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज तिसरा दिवस असून, यावर अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र याचवेळी या संपाचा फटका लाखो बालकांना बसताना पाहायला मिळत आहे. कारण अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.

वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन मोबाईल उपलब्ध करून देणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृति समितीने अंगणवाडी सेविका-मदतनीस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. दरम्यान या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाल्या आहेत. या संपाचा आज तिसरा दिवस आहे. तर या संपाचा फटका लाखो बालकांना बसताना पाहायला मिळत आहे. अंगणवाडी बंद असल्याने सहा वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. सोबतच गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संपामुळे गरोदर मातांचा आहार, स्तनदा मातांचा आहार, झीरो ते तीन वर्षे वयोगटातील मुलांचा आहार, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांचा आहार बंद झालेला आहे. सोबतच कुपोषण कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्यावर असते, याचा देखील फटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या संपावर तोडगा कधी निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औरंगाबादेतील कर्मचारी संपात सहभागी
वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, नवीन मोबाईल उपलब्ध करून देणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्या घेऊन राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील तीन हजार अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. प्रत्येक तालुक्यातील प्रकल्प कार्यालयावर आंदोलने, मेळावे घेण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या