24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअजित डोवाल यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

अजित डोवाल यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : अजित डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. मुंबई स्थित राजभवनात ही सदिच्छा भेट घेण्यात आली.

या फेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय घडलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीच थेट कोश्यारी यांची भेट घेतल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं, तरी भेटीदरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, यावरुन राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. अद्याप भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, अजित डोवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन तिथल्या गणपतीचं दर्शनही घेतलं आहे. त्यानंतर आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जातील.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या