29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रअण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

एकमत ऑनलाईन

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते राळेगणसिद्धीत दाखल झाले असून पुढील आठवडाभर त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, ८४ व्या वर्षीही हजारे यांचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत झाले. या वयात एवढे नॉर्मल रिपोर्ट अभावानेच पाहायला मिळतात, असे रुबी रुग्णालयाचे प्रमुख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी सांगितले.

अण्णा हजारे नियमित वैद्यकीय तपासणीसाठी गुरूवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मुख्य तपासण्या करण्यात आल्या. उर्वरित तपासण्या आज शुक्रवारी सकाळी करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या