37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्राइमअधिका-याच्या दुस-या पत्नीच्या घरात निघाले घबाड

अधिका-याच्या दुस-या पत्नीच्या घरात निघाले घबाड

एकमत ऑनलाईन

भुवनेश्वर : ओडिशा दक्षता विभागाने भुवनेश्वरमध्ये दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये तब्बल ३.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. जी राज्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे, असे विभागाचे संचालक वाय. के. जेठवा यांनी सांगितले आहे.

लघु पाटबंधारे विभागाचे कार्तिकेश्वर राऊळ यांच्या दुस-या पत्नीच्या अपार्टमेंटमधून २.५० कोटी रुपये आणि सलिया साहीमधील त्यांच्या बहिणीच्या घरातून १.४१ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राऊळ यांची दुसरी पत्नी कल्पना प्रधान हिच्या चौकशीदरम्यान, तिने बीबीएसआर येथील सलिया साहीमध्ये तिच्या बहिणीच्या घरात रोख रक्कम आणि सोने इत्यादी लपवून ठेवल्याची कबुली दिली. आज पहाटे ओडिशा दक्षता विभागाने या ठिकाणाचा शोध घेतला असता, त्यांना ही मोठी रक्कम आढळून आली आणि त्यांनी ही रक्कम जप्त केली. दरम्यान, रोख रकमेसह अंदाजे ३५४ ग्रॅम सोने आणि ७८,५०,००० रुपयांच्या रोख पेमेंटवर बीबीएसआर, पोखरीपुट इथे केसरी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडकडून ट्रिपलेक्स खरेदी केल्याची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या