23.5 C
Latur
Wednesday, March 29, 2023
Homeमहाराष्ट्रअनिल परब यांची अटक तूर्तास टळली

अनिल परब यांची अटक तूर्तास टळली

एकमत ऑनलाईन

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत परब यांना अटक करू नका, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणी परब यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी दापोलीतील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर परब यांनी कोर्टात धाव घेतली होती. काही तासांपूर्वीच, जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचे असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता.

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचेही नाव आले होते. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या