29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजन‘अनुराधा’ ७ भागांची वेबसीरिज

‘अनुराधा’ ७ भागांची वेबसीरिज

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिग्दर्शक संजय जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या एकत्र येण्याने जेव्हा एखादी कलाकृती घडते, तेव्हा ती नेहमीच उत्तम असते, यात काही शंका नाही. तसेच काहीसे ‘अनुराधा’ या वेबसीरिजच्या बाबतीत घडताना दिसून येते. संजय जाधव आणि तेजस्विनी पंडित या जोडीने एकत्र येत सादर केलेल्या कलाकृतीला ‘ट्रिपल धमाका’च म्हणता येईल.

कारण, टीझर पाहता लक्षात येते की ‘अनुराधा’मध्ये तेजस्विनी पंडितच्या एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन व्यक्तिरेखा दिसून येत आहेत. यावरून या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित आपल्याला तिहेरी भूमिकेत दिसणार आहे का? हे तुम्हाला वेबसीरिज पाहिल्यावरच कळेल. संजय जाधव यांनी मात्र या वेबसीरिजसाठी तिहेरी भूमिका निभावली आहे. प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अनुराधा’ या वेबसीरिजच्या माध्यमातून संजय जाधव तांत्रिकदृष्ट्या तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. म्हणजेच दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमॅटोग्राफर व लेखनाची धुराही सांभाळली आहे.

‘अनुराधा’बाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, आपला मराठी प्रेक्षकवर्ग हा थोडा भावनिक आहे, त्यामुळे त्यांना ही व्यक्तिरेखा आपलीशी वाटावी, जवळची वाटावी हे माझ्यासाठी प्रत्येकवेळी महत्त्वाचे असते. ‘अनुराधा’ बघताना प्रत्येक भागामध्ये तुमची उत्कंठा वाढते. तुम्ही पुढचा भाग बघण्यास उत्सुक होता. शेवटी सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. त्यामुळे ‘अनुराधा’ हे एक सस्पेन्स आणि थ्रिलर पॅकेज आहे.
या वेबसीरिजचे वैशिष्ट्य म्हणजे तेजस्विनी आणि संजय जाधवची तिहेरी भूमिका. दोघांच्याही या भूमिकांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या