भूवनेश्वर : वृत्तसंस्था – भ्रष्टाचाराविरोधात सीबीआयने देशभर कारवायांचा धडाका हाती घेतल्यांतर मंगळवारी डोळे विस्फारून टाकणारे घबाड ओडीशा पथकाच्या हाती लागले. एका सेवानिवृत्त रेल्वे अधिका-याच्या घरी टाकलेल्या छाप्यात १७ किलो सोने, दागदागीने आणि कोट्यवधींची रोख पाहून पथकाचे डोळे पांढरे झाले आहेत.
सीबीआयने ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये निवृत्त रेल्वे अधिका-याच्या घरावर हा छापा टाकला. यात पथकाला १.५७ कोटी रुपये रोख १७ किलो सोने आणि इतर मालमत्ता सापडली.अधिका-याकडे एवढी मालमत्ता पाहून सीबीआयचे अधिकारीही चक्रावले आहेत. सीबीआयने छापा टाकलेले रेल्वे अधिकार नोव्हेंबर २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. रेल्वे अधिका-याकडे एवढी मोठी संपत्ती आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.