नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना मोठी राजकीय उलथापालथही सुरू असून आता समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते, उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष व अभिनेते राज बब्बर हे सपाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरूल हसन चांद यांनी एक सूचक ट्वीट करत राज बब्बर यांच्या घरवापसीचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि अभिनेता लवकरच पुन्हा समाजवादी होणार आहे, असे ट्वीट फखरूल यांनी केले.