16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रअमिषा पटेलविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

अमिषा पटेलविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

एकमत ऑनलाईन

भोपाळ : ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात भोपाळ न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एका चेक बाऊन्सप्रकरणी तिच्याविरोधात खटला सुरु आहे. याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी तिला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल सोमवारी हे वॉरंट जारी करण्यात आले.

भोपाळ कोर्टात अमिषाच्या विरोधात ३२.२५ लाख रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचा खटला सुरू आहे. यूटीएफ टेलिफिल्म्स प्रायव्हेट लि.ने अमिषावर हा खटला दाखल केला. अमिषाने चित्रपट बनवण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या