न्युयॉर्क : भारतात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारे विधेयक मंगळवारी अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले.
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला २०१५ मध्ये कायदेशीर मान्यता दिली होती. ती रद्द होण्याची चिंता अनेकांना भेडसावत असतानाच अमेरिकेच्या संसदेनेही समलैंगिक विवाहाला कायदेशीर संरक्षण दिले.
हे विधेयक संमत होण्यासाठी ६० मतांची गरज होती. या विधेयकाच्या बाजुने ६१ तर विरोधात ३६ मते पडली. विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी १२ रिपब्लिकन सदस्य ४९ डेमोक्रॅटिक सदस्यांमध्ये सामील झाले