24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या दुस-या-तिस-या टप्प्यातील चाचणीवर बंदी

अमेरिकेत कोव्हॅक्सिनच्या दुस-या-तिस-या टप्प्यातील चाचणीवर बंदी

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : जागतिक आरोग्य संघटनेच्या भाष्यानंतर अमेरिकेने भारत बायोटेकच्या कोविड-१९ प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनचे दुस-या-तिस-या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी थांबवली आहे. डब्ल्यूएचओने अमेरिकन खरेदी एजेन्सींच्या माध्यमातून कोव्हॅक्सिनचा पुरवठा थगित केला होता. संघटनेच्या निरीक्षकांना भारत बायोटेक कोविड लसीत उणीवा आढळल्या होत्या. अमेरिका आणि कॅनडा करिता कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकचे भागीदार ओकुझेन इंकच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार एफडीएचा निर्णय, भारतात कोव्हॅक्सिन उत्पादन संयंत्रांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या भाष्यानंतर लसीच्या चाचणीत सहभागींना लसींची मात्रा देणे ऐच्छिक रुपात अस्थायी बंदी घालण्याची अमेरिकन कंपनीच्या निर्णयावर आधारित आहे.

ओकुझेनने १२ एप्रिल रोजी म्हटले होते, की हा ओसीयू-००२ च्या सहभागींना लस देणे स्वेच्छाने अस्थायी बंदी घालण्याचा परिणाम आहे. दुसरीकडे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (बीबीआयएल) उत्पादन केंद्रांच्या निरीक्षणानंतर आरोग्य संघटनेच्या वतीने मांडलेले म्हणणे समजून घेत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या