19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeराष्ट्रीयअयोध्येत पुढच्या वर्षी रामलल्लांची प्रतिष्ठापना?

अयोध्येत पुढच्या वर्षी रामलल्लांची प्रतिष्ठापना?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अखंड हिंदूंचे अराध्य दैवत प्रभूरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत राम मंदिर प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने एतिहासिक निकाल देऊन झाला आहे. त्यानंतर राम मंदिर उभारणीला वेघ आलेला असताना आगमी लोकसभा निवडणुकीचे टायमिंग साधत अयोध्येत रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेलाही आता वेळ आला आहे.

पुढच्या वर्षी जानेवारीत अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना होणार का याची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे.
राम मंदिराचं काम नेमकं कुठपर्यंत आले आहे? इतकी वर्षे निवडणुकीचा मुद्दा राहिलेले हे मंदिर आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूवीर्च भाविकांसाठी खुले होणार का, याचीही उत्सुकता ताणली जात आहे. सध्या अयोध्येतली लगबग पाहिली तर लवकरच रामलल्लांची प्रतिष्ठापना केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कुठपर्यंत आले आहे राम मंदिराचं बांधकाम?
– सध्या राम मंदिराचे बांधकाम ४० ते ४५ टक्के पूर्ण झाले आहे.
– पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत गर्भगृहाचे काम पूर्ण होऊ शकते.
– २०२४ च्या मकर संक्रांतीपासूनच गर्भगृहात रामलल्लांची प्रतिष्ठापना, भाविकांना दर्शनाची सोय खुली होण्याची शक्यता.
– मंदिर परिसराचे काम त्यानंतरही चालू राहील, जे २०२५ च्या आसपास पूर्ण होण्याची शक्यता.

यूपीच ठरवणार लोकसभेचे गणित
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्यानंतर दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेशच्याच मार्गावरून जावे लागणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यामळे युपीच्या गणितावरच लोकसभेचा पेच भाजपाला सोडवावा लागणार आहे. त्यावरच डोळा ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट २०२० मध्ये रामजन्मभूमी न्यासाचे भूमीपूजन केले होत.

दररोज ५०० कामगार मंदिर उभारणीत व्यस्त
अयोध्येत सध्या एल अँड टी कंपनीचे ५०० कामगार अहोरात्र मंदिराच्या कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे मुख्य मंदिराच्या नक्षीदार खांबासाठी राजस्थानमध्येही एक युनिट व्यग्र आहे. संपूर्णपणे लोकांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या फंडातून हे मंदिर साकारण्याचा ट्रस्टचा मनोदय आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त भरभरुन निधी लोकांनी भक्तीभावाने दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या