22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रअलोट गर्दीत लाडक्या लालबागच्या राजाला निरोप

अलोट गर्दीत लाडक्या लालबागच्या राजाला निरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोविडच्या २ वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लाखो भाविक गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते. आज सकाळी ९.०५ ला लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटींपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला गेला. तब्बल २३ तासांनंतर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

मिरवणुकीत तब्बल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी
लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली. लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ ५० मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तू चोरल्या असल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलिस स्थानकाबाहेर रांग लावली होती. मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या