18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeराष्ट्रीयअल्पवयीन मुली गरोदर होण्याच्या प्रमाणात वाढ

अल्पवयीन मुली गरोदर होण्याच्या प्रमाणात वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात बलात्कार, अल्पवयीन विवाह आणि कमी वयात झालेल्या नातेसंबंधामुळे अल्पवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढते आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत अशा गर्भधारणा होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्वेक्षणानुसार, दिल्लीत गेल्या वर्षी १.२ टक्के अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेची प्रकरणे समोर आली. हे प्रमाण वाढले असून ते ३.३ टक्के झाले आहे.

वयवर्षे १५ ते १९ दरम्यान होणा-या गर्भधारणेला अल्पवयीन गर्भधारणा म्हटले जाते. २०२०-२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ मध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे. लैगिक छळ म्हणजेच बलात्कार, कमी वयात झालेले लग्न आणि कमी वयात नातेसंबंध निर्माण होणे, ही यापाठची महत्वाची कारणे आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

२०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत १५ ते १९ वयोगटादरम्यान अल्पवयीन गर्भधारणेचा दर २.१ टक्के होता. तो ३.३ टक्यांपर्यंत वाढला आहे. जेव्हा हे सर्वेक्षण होत होते. तेव्हा १५ ते १९ वयोगटातील मुलींना अपत्य झाली होती. तर काही गरोदर होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गावात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण जास्त आहे. गावांत अल्पवयीन गर्भवतींचा दर ९.७ टक्के आहे. तर शहरात तो ३.२ टक्के आहे.

गावातील मुलींचा अधिक समावेश
गावात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याचे प्रमाण जास्त आहे. गावांत अल्पवयीन गर्भवतींचा दर ९.७ टक्के आहे. तर शहरात तो ३.२ टक्के आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत १५ ते १९ वयोगटादरम्यान अल्पवयीन गर्भधारणेचा दर २.१ टक्के होता. तो ३.३ टक्यांपर्यंत वाढला आहे.

वैज्ञानिक क्षेत्राचे अपुरे ज्ञान
गावातील १५ ते १९ वयोगटातील बलात्कार पिडितांना तसेच त्यांच्या कुटूंबातील लोकांना वैद्यकीय क्षेत्राचे फारसे ज्ञान नसते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तर एक कारण असेही आहे की, काही गावात मुलींचे लवकर लग्न केले जाते. बदलत्या काळानुसार अल्पवयीन मुलींची गर्भधारणा ही चिंतेची बाब बनली आहे.

शहरांमध्ये काय स्थिती?
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अल्पवयीन तरूणाईला रिलेशनशीपमध्ये असणे आवडू लागल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे मुली गर्भवती होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशी प्रकरणे अनेकदा खासगी रूग्णालयात जातात, पण काहीवेळा अशी प्रकरणे सरकारी रूग्णालयांमध्येही येतात. शहरात मुलीची वैद्यकीय स्थिती पाहून २० आठवड्यात गर्भपात केला जातो. त्यामुळे मुलाला जन्म देण्याची वेळ तिच्यावर येत नाही, हेही एक कारण सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या