26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयअल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे गुन्हा नाही?

अल्प प्रमाणात ड्रग्ज बाळगणे गुन्हा नाही?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात तब्बल २६ विधेयके मांडणार आहे. यामध्ये नार्कोटिक्स ड्रग्ज बिल, २०२१ या विधेयकाचाही समावेश असणार आहे. गांजा, भांग यासह अंमली पदार्थ अल्प प्रमाणात बाळगणे हा गुन्हा मानला जाणार नाही, अशी तरतूद असणार आहे. या कायद्यामुळे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांना सुधारण्याची संधी मिळेल, असे सरकारचे मत आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अनेकांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर ही मागणी पुढे आली होती. माध्यमांच्या वृत्तांनुसार, १० नोव्हेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणातील शिफारसींवर निर्णय घेण्यात आला होता. बैठकीला महसूल विभाग, गृह विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सामाजिक न्याय मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. नार्कोटिक्स ड्रग्ज सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) विधेयक, २०२१ अंतर्गत, अंमली पदार्थांचे वैयक्तिक सेवन गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर ठेवले जाईल.

कायद्यात बदलाची अनेकांची मागणी
१९८५ च्या कायद्यातील कलम १५, १७, १८, २०, २१ आणि २२ मध्ये सुधारणा केल्या जातील. ही सर्व कलमे ड्रग्जची खरेदी, सेवन आणि वित्तपुरवठा यांच्याशी संबंधित आहेत. आर्यन खान प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती आणि लोकांना सुधारण्याची संधी मिळायला हवी असे म्हटले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या