24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeऔरंगाबादकांद्याचे दर कोसळले

कांद्याचे दर कोसळले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतक-यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. कांद्याला सध्या २ रुपये ते ८ रुपयांचा दर मिळत आहे. तर दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पैठण येथील बाजार समितीत कांद्याला अवघे १ रुपया किलोचा भाव मिळाला.

मागील वर्षाचा अनुभव पाहता यंदा शेतक-यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले आहे आणि त्याची सर्वत्र काढणी सुरू आहे. तसेच कांदा साठवण क्षमतेला मर्यादा असल्याने उरलेला कांदा बाजारात आणण्याशिवाय शेतक-यांकडे पर्याय नाही पण बाजारात मिळत असलेला भाव पाहता शेतक-यांना यंदा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे.

खर्च निघणे अशक्य
अतिवृष्टी आणि अवकाळीच्या असमानी संकटातून बाहेर पडत नाही तो बळीराजा पुन्हा एकदा महावितरणाच्या लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीच्या सुलतानी संकटात सापडला आहे. त्यातच आता हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत असल्याने लावलेले खर्चही निघणे अवघड झाले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका
काही दिवसांपासून स्थिर असणा-या कांद्याच्या बाजारभावात दोन आठवड्यांपासून प्रतिक्व्ािंटल तब्बल ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली. लासलगाव, पिंपळगाव आणि येवला बाजार समितीत शेतक-यांनी संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या घसरणीमुळे सारेच चक्रावले असून युक्रेन-रशिया युद्धामुळे ही पडझड झाल्याचा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला आहे.

शेतकरी आर्थिक कचाट्यात
कांदा लागवडीसाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशक औषधी फवारणीसह काढणीसाठी सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. तर शेतक-याचे कष्ट वेगळे मात्र आज कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भावाने लागवड व मजुरीचा खर्चदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे आधी अतिवृष्टीमुळे शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या