26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटल्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट पाहायला मिळत आहे. डब्ल्यू टी आय क्रूडच्या किमतींमध्ये सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी ०.४५ टक्क्यांची घट होते ते ७५.६० डॉलर प्रति बॅरलने विकले जात आहे. याव्यतिरिक्त ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये ०.४९ टक्क्यांची घट होते ते ७५.६०डॉलर प्रति बॅरल असे झाले आहे.
एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असताना देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग १८व्या दिवशीही स्थिर आहेत.

नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही घट केलेली नाही. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीतील उतारानंतर ते आणखी खाली येण्याची मागणी होत आहे. आज मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे.

भारतात इंधनाचे दर ‘जैसे थे’च
केंद्र सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर १० रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला होता. मात्र अद्याप अनेक शहरांत पेट्रोल शंभरीपार आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांहूनही अधिक आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या