27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeआंतरराष्ट्रीयआंदोलकांनी विक्रमसिंघेंचे घर पेटविले

आंदोलकांनी विक्रमसिंघेंचे घर पेटविले

एकमत ऑनलाईन

राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे देणार राजीनामा
कोलंबो : श्रीलंकेतील अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे त्रस्त असलेल्या जनतेने आज राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर कब्जा केला. मोठ्या संख्येने आंदोलक निवासस्थानी पोहोचण्यापूर्वी राष्ट्रपती राजपक्षे निवासस्थान सोडून पळून गेले. दरम्यान, संतप्त आंदोलकांच्या मागणीनुसार त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यातच आंदोलकांनी थेट पंतप्रधान विक्रमसिंघे यांचे खाजगी निवासस्थान जाळले.

आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर ताबा मिळवल्यानंतर गोतबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलकांनी रानिल विक्रमसिंघे यांचे खासगी निवासस्थान पेटवून दिले आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या कांड्या फोडल्या. आंदोलकांवर पाण्याचा मारादेखील करण्यात आला. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या खासगी निवासस्थानाला आग लावली.

पंतप्रधानांच्या वाहनाचेदेखील नुकसान करण्यात आले आहे. रानिल विक्रमसिंघे यांच्या पाठोपाठ गोतबाया राजपक्षे यांनीदेखील राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. गोतबाया राजपक्षेंनी १३ जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचे कळवल्याची माहिती महिंदा यापा अभयवर्धने यांनी दिली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या