भोपाळ, वृत्तसंस्था : कामाचा ताण अस् झाल्याने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील गांधी मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात एका कनिष्ठ महिला डॉक्टरने गुरुवारी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
आकांक्षा माहेश्वरी असे या डॉक्टरचे नाव आहे. ती बालरोग विभागात वैद्यकीय अभ्यासक्राच्या पदव्यूत्तर प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. आकांक्षाच्या या निर्णयाने कुटुंबियांसह कॉलेज प्रशासनालाही धक्का बसला आहे. महिला डॉक्टरने आपल्याला वसतिगृहातील एका खोलीत कोंडून घेत स्वत:लाच एकामागून एक इंजेक्शन दिले. इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे तिचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाईड नोटही मिळाली आहे.
इतका ताण सहन करण्याइतकी माझी ताकद नाही. माफ करा आई आणि बाबा. मित्रांनो माफ करा. वैयक्तिक कारणामुळे मी आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट तिच्या खोलील पोलिसांना सापडली.
आकांक्षाचा मृत्यू झोपीची औषधे आणि पेन किलर इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.