उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदानासह अनेक कलाकारांची हजेरी
अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या पर्वाला आजपासून (३१ मार्च) सुरुवात होत आहे. यंदाच्या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार आहे.
अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलचा उद्घाटन सोहळा होणार आहे. सुमारे पाच वर्षांनंतर आयपीएलला ओपनिंग सेरेमनीसह सुरुवात होणार आहे.
त्यामुळे यंदा धूमधडाक्यात आयपीएलला सुरुवात होणार आहे. ओपनिंग सेरेमनीमध्ये अनेक बॉलिवूडचे कलाकार हजेरी लावणार आहेत. यंदाच्या आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना , तमन्ना भाटिया आणि गायक अरिजित स्ािंह परफॉर्म करणार आहेत. त्याशिवाय कतरिना कैफ आणि टायगर श्रॉफ देखील उद्घाटन समारंभात परफॉर्म करताना दिसणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्याला संध्याकाळी ६:३० वाजता सुरुवात होणार आहे. तसेच, हा उद्घाटन सोहळा सुमारे ४५ मिनिटे चालणार असून, त्यानंतर आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे.