24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयआजपासून पेट्रोल-डिझेल नो परचेस

आजपासून पेट्रोल-डिझेल नो परचेस

एकमत ऑनलाईन

पेट्रोलपंपधारकांचे आंदोलन, पेट्रोलपंपावर रांगाच रांगा
मुंबई : राज्यभरातील पंप चालकांनी ३१ मेपासून पेट्रोल-डिझेल नो परचेस आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे ३१ मे पासून पंपचालक ऑईल कंपनीकडून इंधन खरेदी करणार नाहीत. या आंदोलनाच्या घोषणेनंतर वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचा पुरवठा नियमित नसल्याने सोमवारी अनेक पंप बंद होते. यामुळे सोमवारी (३० मे) रात्री पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरणा-या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पेट्रोल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी केला जात असल्याने त्याचा फटका अनेक पंपांना बसण्यास सुरुवात झाली. आपल्याला पेट्रोल मिळावे, यासाठी अनेक पेट्रोलपंपांना बुकिंग करून ठेवावे लागत होते. अशा बुकिंग करून ठेवलेल्या पंप चालकांना शनिवारी पेट्रोल मिळाले. त्यानंतर अचानक पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याची घोषणा सरकारने केली आणि पंपचालकांपुढे मोठी समस्या उभी राहिली. याचे कारण म्हणजे तुटवड्याच्या काळात या पेट्रोलपंपांनी हजारो लिटर पेट्रोल आणि डिझेल महागात खरेदी केले होते. याचाच मोठा फटका पेट्रोलपंपांना बसला.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क घटविण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. पेट्रोलवर आठ रुपये घटविण्यात आले असून डिझेलचे दर सहा रुपयांनी कमी करण्यात आले. या निर्णयाचा दिलासा हा सर्वसामान्य जनतेला मिळाला. मात्र याचा भुर्दंड पेट्रोल पंप चालकांना मोठा बसलेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या