24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाआज हायहोल्टेज लढत

आज हायहोल्टेज लढत

एकमत ऑनलाईन

सुपर-४ चा सामना, भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार
दुबई : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हॉंगकॉंगचा पराभव करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवल्याने रविवारी भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार असून, आठवड्यात आणखी एकदा हायहोल्टेज लढत पाहता येणार आहे. सुपर-४ मधील ही लढत महत्त्वाची असून, पारंपरिक विरोधकांत उद्या कोण मात देणार, याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे.

आशिया कपमध्ये अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका अगोदरच सुपर-४ मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर शुक्रवारी पाकने हॉंगकॉंगचा मोठ्या फरकाने पराभव करीत सुपर-४ मध्ये प्रवेश मिळविला. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान ही हायव्होल्टेज मॅच पाहण्याची पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे.

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रेडियमवर गेल्या रविवारी या दोन्ही संघात लढत झाली होती. आता या रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी पुन्हा त्याच मैदानावर दोन्ही संघ लढणार आहेत. गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला होता. आता या रविवारी जेव्हा भारत मैदानात उतरेल, तेव्हा अष्टपैलू रविंद्र जडेजा संघात नसणार आहे. दुखापतीमुळे आशिया कपच्या उर्वरित लढतीसाठी तो मुकला आहे. बीसीसीआयने जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे. याच्यासह भारतीय संघात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

असा होऊ शकतो बदल
अवेश खान मागच्या सामन्यात चांगलाच महागडा ठरला. त्यामुळे त्याच्या जागी आता दीपक चहरला संधी देण्यात येऊ शकते. यासोबतच अर्शदीप सिंगही महागडा ठरला होता. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागेल. भारतीय संघाबाहेर अजूनही आर. अश्विन आणि दीपक हुडा आहेत. त्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या