26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeराष्ट्रीयआझम खान अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात

आझम खान अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या तुरुंगात असलेले समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणुकीत प्रचार करता यावा याासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.

आझम खान सध्या उत्तर प्रदेशातील सितापूर कारागृहात आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आझम खान हे सीतापूर कारागृहात आहेत. त्यांचा मुलगा अब्दुल्ला हे काही दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीलाही जामीन मिळाला आहे. आझम खान यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या