29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयआणखी आठ आमदार समाजवादी पक्षात

आणखी आठ आमदार समाजवादी पक्षात

एकमत ऑनलाईन

लखनौ: उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. पाचही राज्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक आमदार आणि मंत्री पक्षाला रामराम ठोकत असून पक्षाला अभूतपूर्व अशी गळती लागलेली आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पार्टीने सत्ताधारी भाजपवर तुफान टीकास्त्र सोडायला सुरुवात केली असून विजयासाठी प्रयत्न चालवले आहेत. वेगवेगळ्या पक्षातून असे मिळून आणखी आठ आमदार समाजवादी पक्षात आज सामील झाले आहेत. यामध्ये बहुजन समाज पक्षाचेही आमदार सामील आहेत.

आज समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एका सभेतील भाषणात म्हटले की, डिजीटल इंडियामधील गडबड कोण विसरू शकते? छापा मारायचा होता दुसरीकडेच आणि छापा आपल्या इथेच मारला. म्हणूनच आता निवडणुका आलेल्या आहेत आणि आम्ही याचीच वाट पाहत होतो. आता सायकलचे हँडल पण ठिक आहे आणि सायकलचे पॅडलही ठिक आहे. आणि पॅडल चालवणारे किती तरुण समोर दिसत आहेत. आता सायकल एकदम मजबूत आहे आणि तिच्या वेगाला कुणीच रोखू शकत नाही. जेंव्हा समाजवादी आणि आंबेडकरवादी सोबत आलेले आहेत, तर कुणीच रोखू शकत नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या