गुवाहाटी : शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, आणखी दोन अपक्ष आमदार शिंदेंच्या गळाला लागले आहेत. गीता जैन आणि किशोर जोरगेवार अशी या अपक्ष आमदारांची नावे आहेत. गीता जैन आणि जोरगेवार गुरुवारी रात्री रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दाखल झाले. तेथे शिंदे गटाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढली आहे.
या अगोदर संजय राठोड, दादा भुसे, आशिष जैयस्वाल, सदा सरवणकर आदी आमदार हॉटेलमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर गीता जैन आणि जोरगेवार तेथे पोहोचले. हे अपक्ष असले, तरी शिवसेनेचे समर्थक असल्याने त्यांचे संख्याबळ वाढले आहे.
दरम्यान, आ. चिमणराव पाटील यांनी आम्ही कट्टर शिवसैनिक. मात्र राष्ट्रवादीसोबत संघर्ष करून आमचे राजकारण सुरू झाले. मविआसोबत आम्हाला मान्य नाही. एकनाथ शिंदे सांगतील ती आमची दिशा असेल, असे म्हटले.