24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रआता थेट राजभवनात उतरविणार हेलिकॉप्टर

आता थेट राजभवनात उतरविणार हेलिकॉप्टर

एकमत ऑनलाईन

शिंदेंचा एक्झिट प्लॅन बदलला
मुंबई : राज्यात मागील ८ दिवसांपासून वायूवेगाने घडामोडी घडत आहेत. यात सातत्याने महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच यासाठी भाजप आणि शिंदे समर्थकांनी जोरदार प्लॅनिंग केले आहे. त्यासाठी आता थेट राजभवनाच्या हेलिपॅडचा वापर केला जाऊ शकतो आणि तेथून थेट विधान भवनात आमदार पाठविले जाऊ शकतात.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदेंच्या बंडाळीने राज्य सरकारला घेरल्याचे स्पष्ट आहे. यामुळे फडणवीसांनी खेळी यशस्वी होताना दिसत आहे. शिंदे गटातील सर्व आमदारांना गुवाहाटीतून गोव्याला नेण्यात आले. तेथे ताज कन्व्हेन्शनमध्ये त्यांची सोय करण्यात आली आहे. मात्र, येथून उद्या विधानभवनाचा रस्ता खडतर आहे. कारण या बंडामुळे शिवसेनेत नाराजी आहे. त्यामुळे गद्दारांना धडा शिकविण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे गोव्यातून विमान थेट मुंबई विमानतळावर येईल आणि तेथून सर्व आमदारांना हेलिकॉप्टरने राजभवनात आणले जाणार असून, राजभवन ते विधान भवनापर्यंत मानवी साखळी करून विधान भवनात पोहोचवले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या