25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रआता मुख्यमंत्री शिंदेंचे मिशन बीएमसी

आता मुख्यमंत्री शिंदेंचे मिशन बीएमसी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी फक्त भाजप आणि उद्धव ठाकरेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख तर तीन विभाग संघटकांना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेह-यांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात दादर-माहीम वडाळा या विभाग क्रमांक १० मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भांडुप विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक ७ मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, सायन, अणुशक्तीनगर विभाग क्रमांक ९ मधून माजी नगरसेवक मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नव्याने या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या