22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयसुप्रीम कोर्टात १३ हजार ट्रान्सफर याचिका प्रलंबित

सुप्रीम कोर्टात १३ हजार ट्रान्सफर याचिका प्रलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात १३ हजार ट्रान्सफर याचिका प्रलंबित असून प्रत्येक खंडपीठ दररोज १० जामिन याचिका व १० ट्रान्सफर याचिकांवर सुनावणी करेल, अशी घोषणा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी फुल कोर्ट मीटिंगमध्ये हा निणर्य घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रचूड मास्टर ऑफ रोस्टर
कोर्टात सुनावणीसाठी येणा-या प्रकरणांची लिस्टिंग सरन्यायाधीशच करत असतात. त्यामुळे त्यांना मास्टर ऑफ रोस्टर म्हटले जाते. न्या. चंद्रचूड सुप्रीम कोर्टाचे ५० वे सरन्यायाधीश असून त्यांनी यु. यु. लळीत नवृत्त झाल्यानंतर त्यानी ९ नोव्हेंबर ला हे पद स्विकारले आहे. त्यांचा कार्यकाळ २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल.

हिवाळी सुट्ट्यांपूर्वी याचिका संपवणार

सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयात १३ खंडपीठ आहेत. प्रलंबित याचिका निकालीत काढण्यासाठी न्यायालयाला दररोज १३० तर आठवड्यात ६५० प्रकरणांचा निपटारा करावा लागेल. या वेगाने सुनावणी झाली तर हिवाळी सुट्ट्यांपूर्वी म्हणजे ५ आठवड्यात ट्रान्सफर याचिका संपुष्टात येतील

रोज जामिनाचे १० खटलेही निकाली
सर्वोच्च न्यायालयीत प्रत्येक खंडपीठाला दररोज १० खटले निकाली काढावे लागतील. बैठकीला उपस्थित न्यायाधीशांनी त्यांना सप्लिमेंट्री बोर्ड म्हणजे एक्स्ट्रा वर्क लोड न देण्याची विनंती केली होती. प्रत्येक जज १२ वाजेपर्यंत लिस्टेड प्रकरणांचा निपटारा करतील.

७४ दिवसांत १० हजार खटल्यांचा निपटारा

माजी सरन्यायाधीश लळीत यांनी आपल्या कार्यकाळात १० हजारांहून अधिक प्रकरणांचा निपटारा केला आहे. काही त्रुटी असलेल्या १३ हजार प्रकरणांचाही त्यांनी निपटारा केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या