21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयआता ६ महिन्यांत बूस्टर डोस घेता येणार

आता ६ महिन्यांत बूस्टर डोस घेता येणार

एकमत ऑनलाईन

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, दुस-या डोसनंतरचा कालावधी ३ महिन्यांनी केला कमी

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुस-या डोसनंतर नऊ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत ६ महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

नवी व्यवस्था लागू करण्यासाठी कोविन प्रणालीत आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना पत्र लिहिले असून, राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाच्या स्थायी तांत्रिक उपसमितीच्या शिफारशीनंतर हा बदल केला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून, आता केंद्र आणि राज्य सरकारांना पाठविलेल्या पत्रात १८ ते ५९ वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना ६ महिन्यांत बूस्टर डोस देता येणार आहे. हे डोस सशुल्क असतील आणि सरकारी केंद्रांवर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि फ्रंटलाईन कर्मचा-यांना मोफत बूस्टर डोस घेता येणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले की, यापूर्वी दुस-या डोसनंतर ९ महिन्यांनी अर्थात ३९ आठवड्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. पण जगभरात कोरोनाच्या लसींबाबत जे नवे संशोधन सुरू आहे, त्यानुसार नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी ग्रुपच्या स्टँडिंग टेक्निकल सब कमिटीने हे निर्देशित केले की, बूस्टर डोसचा कालावधी ९ महिन्यांवरून ६ महिन्यांवर अर्थात २६ आठवड्यांवर आणण्यात यावा. त्यामुळे आता १८ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना दुस-या डोसनंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस घेता येणार आहे.

खाजगी केंद्रांवर सशुल्क डोस
बूस्टर डोस या लाभार्थ्यांना प्रायव्हेट कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरवर अर्थात खासगी लसीकरण केंद्रांवर सशुल्क घेता येईल. तर ६० वर्षांवरील नागरिक आणि फ्रन्ट लाईन वर्कर्सना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बुस्टर डोस घेता येईल.

हर घर दस्तक
बूस्टर डोस घेण्यासाठी आणि एकूणच लसीकरण मोहिमेचा प्रचार करण्यासाठी हर घर दस्तक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून लसीकरण केंद्रापासून घरगुती स्तरावर सर्व लाभार्थ्यांना लस देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय पातळीवर लसीकरणाचा आकडा आता १९८.२० कोटींवर गेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या