22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयआधार-ओळखपत्र लिंकिंगवर आज सुनावणी

आधार-ओळखपत्र लिंकिंगवर आज सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र एकमेकांना जोडण्याच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्या याचिकेवर उद्या दि. २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ही याचिका दाखल केली आहे. हा कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र एकमेकांना जोडण्याला सर्व विरोधी पक्षांनी यापूर्वीही विरोध केला आहे. खासगीकरणाच्या आणि समानतेच्या अधिकाराचे या कायद्यामुळे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांचा आहे.

आधार कार्डाच्या व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत. अशा परिस्थितीत आधार आणि मतदार ओळखपत्र एकमेकांना जोडण्यात आले तर गरीब मतदारांचे सर्वाधिक नुकसान होईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. आधारची माहिती देणे मतदारांना ऐच्छिक असेल. परंतु तसे करताना त्याची कारणे द्यावी लागतील, असे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी मे महिन्यात म्हटले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या