26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रआधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला होईल

आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला होईल

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर ५जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ५जी सेवेमुळे देशात क्रांती घडून येईल, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला होईल असे ते म्हणाले. पुणे आणि मुंबई ही दोन शहरं ५जी सेवेसाठी निवडण्यात आली आहेत. पनवेलच्या एका शाळेचाही त्यात समावेश आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.

५ जी मुळे इंटरनेटचा वेग वाढणार आहे. तसेच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासही मदत होईल. एकंदरीत शिक्षण, वैद्यकीय, शेती, बँकिंग यासह सर्वच क्षेत्रांत एक आमूलाग्र बदल येत्या काळात दिसून येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनच्या दिशेने नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशाचा विचार केला, तर महाराष्ट्र आज देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होईल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ५जी सेवेचाही शुभारंभ केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या