चंदीगड : माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान राज्यसभा खासदार हरभजन सिंग याने शनिवार दि. १६ एप्रिल रोजी मोठी घोषणा केली असून, राज्यसभेचा सर्व पगार शेतक-यांच्या लेकीच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे म्हटले आहे. हरभजन सिंग याने ट्विट करत याची माहिती दिली आहे. भज्जीच्या या निर्णायानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भज्जीच्या निर्णायचे स्वागत करण्यात आले आहे.
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगला अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. नुकतीच भज्जीने खासदार म्हणून शपथ घेतली. त्यानंतर कामकाज सुरू केल्यानंतर हरभजन सिंग याने मोठं पाऊल उचलले आहे. हरभजन सिंग याने शनिवारी ट्विट करत घोषणा केली. ट्विटमध्ये भज्जी म्हणाला की, एक राज्यसभा सदस्यच्या रुपाने माझा सर्व पगार शेतक-यांच्या मुली आणि सामाजिक कार्यासाठी देणार आहे. देशाला आणखी उत्तम आणि कणखर करण्यात योगदान देऊ इश्चितो. त्यासाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे.