18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीआमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

एकमत ऑनलाईन

परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर दि. १४ ते १७ ऑक्टोबर दरम्याण कार्यक्रम होणार आहेत. यासाठी भव्य मंडप देखील उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

आदेश बांदेकर यांच्या उपस्थित होम मिनिस्टर स्पर्धेसह अन्य सामाजिक उपक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे.
आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटना सेवाभावी संस्था पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हे सर्व कार्यक्रम एकाच मैदानावर होणार असल्याने शहरातील जिंतूर रस्त्यावरील नूतन विद्यालयाच्या मैदानावर ५ हजार नागरिक बसतील असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. १४ ऑक्टोबर रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे महारोजगार मेळावा पार पडणार आहे. जागतिकरणाच्या युगात विज्ञान तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाले आहेत.

याचा लाभ परभणीच्या युवकांना व्हावा यासाठी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक दर्जाच्या ३०० कंपन्यांचे प्रतिनिधी इतिहासात प्रथमच परभणी शहरात बेरोजगार युवकांना नोकरी देण्याच्या देण्यासाठी महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने येत आहेत. जागतिक पातळीवरील नामांकीत कंपनीमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, गोवा येथे नोकरीची संधी युवकांना मिळणार आहे. आठवी पास, नापास ते पदव्युत्तर, कोणत्याही शाखेचे पदवीधर, डिप्लोमा डिग्रीधारक, एमबीए, फार्मसी, अ‍ॅग्रीकल्चर, आयटीआय अशा सर्वांसाठी ही संधी उपलब्ध असणार आहे. मुलाखत व निवड एकाच ठिकाणी नोकरीची शंभर टक्के हमी देखील असणार आहे.

शनिवारी होममिनीस्टर स्पर्धा
शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता अभिनेते व शिवसेना उपनेते आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थित होम मिनिस्टर या स्पर्धेचे आयोजन नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. यासाठी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत आहे. उपस्थित सर्वच महिलांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून प्रत्येक सहभागी महिलांना पारितोषिक दिले जाणार आहे.

रविवारी नृत्य स्पर्धा
१६ ऑक्टोबरला युवा जल्लोष जागर युवा शक्तीचा अंतर्गत नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार सकाळी दहा वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे या स्पर्धेत समूह नृत्य मोठा गट, समूह नृत्य शालेय गट, वैयक्तिक नृत्य मोठा गट, वैयक्तिक नृत्य शालेय गट, लावणी नृत्य शालेय गट, लावणी नृत्य खुला गट यांचा समावेश आहे.असून विजेत्यांना बक्षीस मिळणार आहेत

सोमवारी बचत गट मेळावा
सोमवार दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी विधवा,परितक्त्या महिलांना शिलाई मशीन वाटप व बचत गट मेळावा व प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यापासून जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या महिलांना मासाहेब मीनाताई ठाकरे विधवा परीतक्त्या स्वावलंबन संकल्प योजनेअंतर्गत शिलाई प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशा सर्व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वतीने मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला बचत गटांचा महामेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या