26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeमहाराष्ट्रआमदार राणे यांची सुप्रीम कोर्टात धाव

आमदार राणे यांची सुप्रीम कोर्टात धाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता २७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. यापूर्वी हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राणे यांनी पोलिस स्थानकात हजेरी लावली. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या