22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयआयएएस केडर नियमावली बदलाच्या प्रस्तावाला विरोध

आयएएस केडर नियमावली बदलाच्या प्रस्तावाला विरोध

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आयएएस केडर नियम १९५४ मध्ये संशोधन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद झाले आहेत. केंद्राने राज्यांकडे आयएएस अधिका-यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी अधिका-यांची यादी मागवली होती. या प्रस्तावावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.

केंद्र सरकार हे संशोधन ३१ जानेवारीपासून सुरू होणा-या संसदेच्या सत्रात सादर करू शकते. यासंदर्भात केंद्राने २५ जानेवारीच्या आत राज्यांकडून त्यांचे उत्तर मागवले आहे. आयएएस केडर नियम १९५४ नुसार या नियमांतर्गत येणा-या आयएएस अधिका-यांची भरती केंद्राकडून होते. मात्र, ज्यावेळी त्यांना राज्य केडरचे वाटप केले जाते, त्यावेळी ते राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात. आयएएस केडरच्या नियमांनुसार आयएएस अधिका-याला संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संमतीनंतरच इतर राज्यांमध्ये प्रतिनियुक्ती दिली जाते.

नवा नियम घटनाविरोधी
अधिका-यांना प्रतिनियुक्तीवर केंद्रात पाठवण्याचा नवा नियम हा घटनाविरोधी असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला, तर महाराष्ट्र सरकारनेदेखील या नव्या नियमांना विरोध केला आहे. यावर केंद्राने मागील ७ वर्षांत अधिका-यांची संख्या दुपटीने वाढली आहे. तरीही केंद्रात प्रतिनियुक्तीवर येणा-या अधिका-यांची संख्या आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कामकाजावर परिणाम होत आहे, असे केंद्राचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या