24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाआयपीएलचा समारोप थाटात होणार

आयपीएलचा समारोप थाटात होणार

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअवर २९ मे रोजी आयपीएल २०२२ चा अंतिम सामना होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आधीच फायनलमध्ये पोहचला आहे, तर राजस्थान रॉयल्सनेही आरसीबीला धक्का देत फायनलमध्ये धडक मारलीे. आता आयपीएलचा २०२२ चा समारोप दिमाखात होणार आहे.
फायनलचा सामना सुरु होण्याआधी एक दमदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून अनेक तारे-तारका यावेळी त्याठिकाणी अवतरतील. यामध्ये सुपरस्टार रणवीर सिंहसह संगीतकार ए. आर. रहमान तसेच क्रिकेट जगतातील मोठमोठ्या हस्तींचा समावेश असणार आहे.

यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आयपीएलची सांगता जंगी होणार आहे. त्यामुळे २९ मे रोजी अनेक मान्यवर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याठिकाणी तब्बल ६ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. आयपीएलच्या फायनल सामन्यापूर्वी समारोप कार्यक्रम होणार आहे.

यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. आयपीएलचा क्लोजिंग समारोप २९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहे. हा कार्यक्रम ५० मिनिटांपर्यंत रंगणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे, तर ८ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या