23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्रीडाआयपीएलची आज अंतिम लढत रंगणार

आयपीएलची आज अंतिम लढत रंगणार

एकमत ऑनलाईन

गुजरात ठरणार विजेता की राजस्थानला संधी
अहमदाबाद : आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रविवारी (२९ मे) लढत होणार आहे. १५ वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवणा-या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. दुस-या बाजूला दिग्गजांचा पराभव करत प्रथमच लीगमध्ये खेळणा-या गुजरात टायटन्सला नवा इतिहास घडवण्याची संधी आहे. दोन्हीही संघ तगडे आहेत. त्यामुळे यंदाचा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

गुजरात टायटन्सचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्सशी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी रात्री ८ वाजता रंगणार आहे. गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर-१ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. गुजरात टायटन्सला पहिला हंगाम खेळत असताना त्यांना चॅम्पियन बनण्याची संधी आहे, तर राजस्थान रॉयल्सने २००८ साली विजेतेपद पटकावले आहे. आता यंदाचे जेतेपद पटकावण्यासाठी उद्या अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या हे दोन खेळाडू मैदानावर उतरतील. गेल्या काही महिन्यात करिअरमधील चढ-उतार पाहिलेल्या हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा यांनी दोन महिन्यात गुजरात संघाला अव्वल स्थानी पोहोचवले. वन मॅच वंडर असे म्हटले जाणा-या राहुल तेवतिया आणि सासत्याने चांगली कामगिरी करणारा डेव्हिड मिलरसारख्या खेळाडूंचा हा संघ कागदावर मजबूत वाटत नव्हता. पण प्रत्यक्षात या खेळाडूंनी कमाल करून दाखवली. फॉर्ममध्ये परतलेल्या हार्दिकने कर्णधारपदाचा दबाव न घेता फलंदाजी केली. दुस-या बाजूला पाच वर्ष लय मिळवण्यासाठी धडपडणा-या मिलरने सर्वांना धक्का दिला. तसेच तेवतियाने देखील आपली खेळी दाखवून दिली.

दुसरीकडे प्रतिस्पर्धी असलेला राजस्थानचा संघ कमी नाही. आयपीएलचे पहिले विजेतेपद त्यांनी वॉर्नच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. त्यानंतर ते प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. संजू आणि हार्दिक पांड्या यांची क्षमता सारखीच आहे. संजू अशा काही खेळाडूंपैकी आहे, ज्याने भारतासाठी अद्याप एकही टी-२० मॅच खेळली नाही. पण त्याची लोकप्रियता अधिक आहे. संजूकडे आर अश्विन, युजवेंद्र चहल, जोस बटलर, ट्रेंट बोल्डसारखे दिग्गज तर यशस्वी जयसवाल आणि प्रसिद्ध कृष्णासारखे युवा खेळाडू आहेत. संजूने या सर्वांना सोबत घेत संघाला इथपर्यंत आणले आहे. उद्या होणा-या फायनल सामन्यात नवे हिरोदेखील होतील आणि अनेक विक्रम देखील तयार होतील, असा क्रिकेटप्रेमींचा अंदाज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या