29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयआयशा मलिक पाकच्या पहिल्या महिला न्यायाधीश

आयशा मलिक पाकच्या पहिल्या महिला न्यायाधीश

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आयशा मलिक यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्चस्तरीय न्यायिक समितीने लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आयशा मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीस मान्यता दिली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आयशा मलिक यांच्या नावाला देशाच्या न्यायिक आयोगाने मान्यता दिली आहे. संसदीय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना हा दर्जा दिला जाईल. ३ जून १९६६ रोजी जन्मलेल्या आयशा मलिक यांनी कराचीच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, कराची ग्रामर स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर पदवी प्राप्त केली. त्यानंतर कायदेशीर शिक्षणाकडे कल वाढला आणि लाहोरच्या कॉलेज ऑफ लॉमधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील हार्वर्ड स्कूल ऑफ लॉमधून एलएलएमचे (मास्टर्स ऑफ लॉ) शिक्षण घेतले. १९९८-१९९९ मध्ये त्यांची ‘लंडन एच. गॅमन फेलो’ म्हणून निवड झाली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या