लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पार्टीसह छोटे-मोठे पक्ष एकत्र आले आहेत.
तसेच अनेक राजकीय मंडळी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलतानादेखील पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.