22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाआरसीबीची पाचव्यांदा नीचांकी धावसंख्या

आरसीबीची पाचव्यांदा नीचांकी धावसंख्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबी संघाने हैदराबादविरोधात लाजिरवाण्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हैदराबादविरोधात आरसीबीचा संघ १६.१ षटकांत अवघ्या ६८ धावांत बाद झाला. यानंतर आरसीबीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. आयपीएलमध्ये आरसीबीने पाचव्यांदा सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवली.

आरसीबीचा संघ पाचव्यांदा ७० धावांच्या आत ऑलआऊट झाला, तर याआधी आरसीबीचा संघ चार वेळा ७० धावांच्या आत सर्वबाद झाला होता. हैदराबादच्या भेदक मा-यापुढे आरसीबीचा संघ आपली निचांकी धावसंख्येचा विक्रम मोडतो की काय, अशी अवस्था झाली होती. पण अतिरिक्त धावसंख्येमुळे ही नामुश्की टळली. पण आरसीबीचा संघ ६८ धावांत संपुष्टात आला. याआधी आरसीबीचा संघ फक्त ४९ धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर ही दुसरी निचांकी धावसंख्या आहे. ७० धावसंख्येच्या आत पाचवेळा आरसीबीचा संघ बाद झाला आहे.

शनिवारच्या सामन्यात काय झाले?
मार्को जान्सन आणि नटराजन यांच्या भेदक मा-यापुढे आरसीबीचा संपूर्ण संघ १६.१ षटकात ६८ धावांत संपुष्टात आला. आरसीबीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश प्रभुदेसाईने आरसीबीकडून सर्वाधिक धावा केल्या. सुयेश प्रभुदेसाईने १५ धावांची खेळी केली. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी आग ओकणारी गोलंदाजी केली. दुस-याच षटकात आरसीबीचे आघाडीचे तिन्हीही फलंदाज माघारी परतले. विराट कोहली आणि अनुज रावत यांनाही एकाही धाव काढता आली नाही. तर फाफ डु प्लेसिस ५ धावा काढून बाद झाला. ग्लेन मॅक्सेवलही १२ धावा काढून नटराजनचा शिकार झाला. हैदराबादच्या गोलंदाजीसमोर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. आरसीबीकडून फक्त सहा चौकार लगावण्यात आले. यात मॅक्सेवलने दोन तर फाफ डु प्लेसिस, सुयेश प्रभुदेसाई, शाबाज अहमद आणि वानंदु हसरंगा यांन प्रत्येकी एक एक चौकार लगावले.

नामुष्कीजनक रेकॉर्ड
४९ : कोलकाता, २०१७.
६८ : हैदराबाद, २०२२
७० : चेन्नई,२०१९
७० : राजस्थान, २०१४

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या