22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रआवक वाढली; टोमॅटोच्या दरात घसरण

आवक वाढली; टोमॅटोच्या दरात घसरण

एकमत ऑनलाईन

पुणे : सध्या राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कारण सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. ८० रुपयांवरून टोमॅटोचे दर थेट २५ ते ३० रुपयांवर आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे. दहा दिवसांत दर जवळपास निम्म्यावर आले आहेत.

सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ८० रुपयांवरून टोमॅटोचे दर हे थेट २५ ते ३० रुपयांवर आले आहेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतक-यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून राज्यात टोमॅटोची आवक होत आहे. त्यामुळे दर घसरत आहेत.

मागील एक महिन्याचा विचार केला तर वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाला होता. या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, शेतक-यांची दिवाळी अडचणीत गेली. मात्र आता दिवाळीनंतर तरी शेतक-यांच्या राहिलेल्या मालाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती.

पण तसे चित्र सध्या दिसत नाही. सध्या टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. १० ते १५ दिवसांची तुलना केली तर टोमॅटोचे दर ८० रुपयांवर गेले होते. आता मात्र, हे दर २५ ते ३० रुपयांवर खाली आले आहेत. बाजारपेठेत टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने दर घसरल्याची माहिती यावेळी नाशिक बाजारातील विक्रेत्यांनी दिली. हे दर आणखी घसरण्याची शक्यता देखील विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या