26.1 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयआसाममध्ये संशयित अतिरेक्यांना अटक

आसाममध्ये संशयित अतिरेक्यांना अटक

एकमत ऑनलाईन

बारपेटा : अल कायदा संघटनेच्या बांग्लादेशमधील गटाशी संबंधित ६ संशयित दहशतवाद्यांना आसामच्या बारपेटा जिल्ह्यात अटक केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. होव्ली शहरातील मदरशातून या ६ संशयितांना पकडण्यात आले असून, त्यांचे ‘अल कायदा इन इंडियन सब कॉन्टिनंट’शी (भारतीय उपखंडातील अल कायदा, एक्यूआयएस) संबंध असल्याचा संशय असल्याचे पोलिस अधीक्षक अमिताव सिन्हा यांनी सांगितले.

४ मार्चला आम्ही एका आत्मघातकी दहशतवाद्याला (जिहादी) पकडले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार आम्ही या सहा संशयितांना अटक केली. सर्वजण बारपेटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या