16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयज्यांच्यात लढण्याची हिंमत ते भाजपात जाणार नाहीत

ज्यांच्यात लढण्याची हिंमत ते भाजपात जाणार नाहीत

एकमत ऑनलाईन

दिसपूर : जे धाडसी आहेत, ज्यांच्यात लढण्याची हिंमत आहे ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत, असे सांगत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना चिमटे काढले.

आसामचे मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांनी आगामी काळात आणखी काही काँग्रेस नेते भाजपमध्ये सामील होतील, असे संकेत देताना कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत थरूर जिंकले असते तर पक्षात लोकशाही आहे, असे वाटले असते, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे नेते थरुर यांनी सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल करीत आसामच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यात ते म्हणाले, ज्यांच्यामध्ये लढण्याची, संघर्ष करण्याची तयारी नसेल त्यांनी भाजपमध्ये सामील व्हावे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या