26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडाआॅस्ट्रेलियाच विश्वविजेता

आॅस्ट्रेलियाच विश्वविजेता

एकमत ऑनलाईन

न्यूझीलंडविरुद्ध ८ गडी राखून दणदणीत विजय
दुबई : दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद पटकावले. टी-२० प्रकारात प्रथमच आॅस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला. टी-ट्वेंटीमधील आॅस्ट्रेलियाचे हे पहिलेच जेतेपद ठरले आहे.
आॅस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विल्यमसनच्या वादळी ८५ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १७२ धावा केल्या. सुरुवातीला संथ खेळणाºया न्यूझीलंडला विल्यमसनचा आधार मिळाला. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाने कोणताही दबाव न घेता दमदार फलंदाजी केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दमदार अर्धशतके ठोकली. १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार ठोकत आॅस्ट्रेलियाचे स्वप्न पूर्ण केले. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत आॅस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला, तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला होता. दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे सामने अतिशय रोमांचक ठरले होते. मिचेल मार्शला सामनावीर, तर डेव्हिड वॉर्नरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी आॅस्ट्रेलियासाठी सुरुवात केली. तिसºया षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिंचला (५) माघारी धाडले. डॅरिल मिशेलने फिंचचा सुंदर झेल घेतला. फिंचनंतर मिचेल मार्शने ताबा घेतला. फिरकीपटू ईश सोधीने टाकलेल्या सातव्या षटकात आॅस्ट्रेलियाने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर मार्श-वॉर्नर यांनी जोरदार फटकेबाजी केली. ११ व्या षटकात वॉर्नरने नीशमला षटकार ठोकत आपले अर्धशतक फलकावर लावले. बोल्टने १३ व्या षटकात गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने वॉर्नरची दांडी गुल केली. वॉर्नरने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. वॉर्नरनंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. वॉर्नर माघारी परतला असला तरी मार्शने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. १४ व्या षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. १९ व्या षटकात आॅस्ट्रेलियाने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मार्शने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या, तर मॅक्सवेल २८ धावांवर नाबाद राहिला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या