26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडआ. केराम यांचे आदिवासींच्या मागण्यांसाठी निवेदन

आ. केराम यांचे आदिवासींच्या मागण्यांसाठी निवेदन

एकमत ऑनलाईन

किनवट : किनवट माहूर तालुक्यातील आदिवासी समाजाचा विविध समस्या बाबत आ. केराम यांनी महामहिम राज्यपालांकडे मतदार संघातील आदिवासी समाजांच्या विविध समस्यांचा पाढा वाचत आदिवासीं समाजास भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी संबंधितांना लेखी आदेश मिळावेत यासाठी राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेवून लेखी निवेदन दिले.

सोमवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १२ वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत नियोजित वेळेत आमदार भिमरावजी केराम यांनी ही मागणी केली. दरम्यान किनवट विधानसभा मतदार संघाचा आदिवासी समाजाचा एकमेव आमदार या नात्याने मतदार संघातील आदिवासी लोकवस्त्यांच्या खेडे गावांना दळण-वळणासाठी कुठलेही रोड रस्ते, विजेची सोय, आरोग्य, शिक्षण, पाणी, उद्योग, व्यवसाय नाहीत. अशा अनेक मुलभुत सोयीसुविधांच्या विकासापासून आदिवासी समाज राजकीय हिताचा बळी ठरून विविध विकास योजनापासून वंचीत आहे.

परिणामी आदिवासी क्षेत्रबंधीत (पेसा) अंतर्गत मोडणा-या आदिवासी खेडे गावांच्या व आदिवासी समाजाचा शैक्षणिक, आर्थीक, सरकारी नौकर भरती, उद्योग व्यवसायाचा माध्यमातुन तमाम आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी लक्ष पुरवुन या भागातील आदिवासींचा समस्यांची सोडवणूक करुन त्यांची तातडीने अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे असल्याने संबंधितांना तातडीने आदेशीत करण्याची मागणी आ. भिमरावजी केराम यांनी महामहिम राज्यपाल भगतंिसह कोश्यारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीदरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच किनवट तालुका हा नक्षलप्रवण भागाच्या यादीतून वगळला गेल्याने असल्याने अनेकांना याचा फटका बसणार असल्याने या विषयावरही सखोल चर्चा करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या