24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रआ. गणेश नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा

आ. गणेश नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात पीडित महिलेने नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

मार्च २०२१ मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॉल्व्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप करत संबंधित महिलेने सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने नेरूळ पोलिस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याने संबंधित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या. याबरोबरच गणेश नाईक यांनी स्वत: पुढे येऊन डीएनए चाचणी करावी आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या