24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeऔरंगाबादइकडे विकास कामांची मोठी कारवाई करायची आहे; एकनाथ शिंदे

इकडे विकास कामांची मोठी कारवाई करायची आहे; एकनाथ शिंदे

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबाद दौ-यावर आहेत. त्यांचा आज औरंगाबाद दौ-याचा दुसरा दिवस आहे. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे.

संजय राऊत यांच्या ईडी कारवाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता, इकडे विकास कामांची मोठी कारवाई करायची आहे, अशी मिष्किल प्रतिक्रिया देत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले आहे. एकनाथ शिंदे हे आज औरंगाबाद दौ-यावर असून, त्यांच्या उपस्थितीमध्ये आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक देखील पार पडणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौ-याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत
दरम्यान एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौ-यावर आहेत, मात्र त्यांचा कालचा दिल्ली दौरा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे हे काल गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी थेट दिल्लीमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास चाळीस मिनिटे चर्चा झाली. या चर्चेमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या