औरंगाबाद : इन्स्टाग्रामचे बनावट खाते तयार करून युवतीच्या फोटोचा आणि नावाचा वापर करत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणा-या मवाल्याच्या स्थानिक सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दीपक सुभाष दराडे (१९, मूळ रा. लिंबाळा, ता. जिंतूर, जि. परभणी, ह. मु. आपत भालगाव) असे त्याचे नाव आहे.
युवतीने १२ एप्रिल रोजी सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारत माने, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, जमादार कैलास कामठे, संदीप वरपे, नितीन जाधव, रवींद्र लोखंडे, गणेश घोरपडे, सविता जायभाय, लखन पाचोळे, गणेश नेहरकर, योगेश दारवंटे, रूपाली ढोले यांनी दीपक दराडेला शोध घेऊन त्याला भालगावातून अटक केली. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.