23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Home‘इमर्जन्सी‘मधून महिमाचे जबरदस्त कमबॅक

‘इमर्जन्सी‘मधून महिमाचे जबरदस्त कमबॅक

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री महिमा चौधरी आज १३ सप्टेंबर रोजी ४९ वा वाढदिवस साजरा करते आहे. पदार्पणातच हिट सिनेमा देणारी ही अभिनेत्री लवकरच ‘इमर्जन्सी‘ या सिनेमात दमदार लूकमध्ये दिसणार आहे. ‘परदेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण करणा-या अभिनेत्री महिमा चौधरीचा १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंगमध्ये जन्म झाला.

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिचा पहिलाच सिनेमा ‘परदेस’ सुपरहिट झाला होता. शाहरूख खान, अमरीश पुरी हे दिग्गज कलाकार समोर असताना या चुणचुणीत मुलीने तिच्या अभिनयाची छाप सोडली.

महिमाने विविध हिट सिनेमांत काम केले आहे. ‘बागबान’, ‘डार्क चॉकलेट’, ‘धडकन’, ‘कुरुक्षेत्र’ या सिनेमांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. मात्र तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण आयुष्याला ब्रेक लागला होता. तिने स्तनाच्या कर्करोगाशी लढा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर महिमाचा व्हीडीओ शेअर करत तिच्या आजाराविषयी जून २०२२ मध्येच माहिती दिली होती. या व्हीडीओमध्ये महिमाने सांगितले होते की, कसे अनुपम खेर यांनी तिला एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी यूएसमधून बोलावले आणि त्यानंतर तिने अनुपम यांना तिच्या आजाराविषयी सांगितले.

महिमा आता कंगना राणावतच्या बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती पुपुल जयकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीचा लूकही समोर आला असून चाहते तिच्या या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या